जन्मांक 7 असणा-या व्यक्तिंचे वैशिष्ठ्य म्हणजे या व्यक्ति अंतर्मुख असतात. त्या वरून शांत दिसतात, पण मनातून बेचैन असतात. या व्यक्ति सतत कांहीतरी विचार करत असलेल्या दिसतात. त्यांना एकांताची आवड असते, आणि अगदी कामाच्या ठिकाणीही एकांताचा अनुभव घेण्याचे कसब त्यांच्याकडे असते.
यांची आकलन शक्ती आणि समज चांगली असते, त्यामुळे कोणताही नवा विषय त्यांना चटकन आणि सहज समजतो.
आपले काम ही त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते.
या व्यक्ती निरीक्षण आणि विश्लेषण करण्यात पटाईत असतात. यांच्या नजरेतून एखादी गोष्ट सुटणे अशक्य असते. त्यामुळे या व्यक्ती संशोधक, तपास अधिकारी, गुप्तहेर म्हणून चांगले काम करू शकतात.
यांच्याकडे गुपिते राखण्याचे कसब चांगले असते.
यांचे व्यक्तिमत्व भारदस्त असते, हे सहसा वजनदार असतात आणि यांचा आवाजही भारदस्त असतो. तुम्हाला जन्मांक 7 असणारी पण किरकोळ शरीरयष्टीची व्यक्ती सहसा सापडणार नाही. या व्यक्ती अंतर्मुख असतात. या व्यक्ति कोणताही निर्णय खोलवर विचार करून घेत असतात. त्यांच्याकडे इंट्यूशन पॉवर असते, त्यामुळे इतरांना सहसा लक्षात न येणा-या पुढील काळात होऊ शकणाऱ्या गोष्टी यांच्या चटकन लक्षात येतात.
शिक्षण यांच्याकडे उच्च दर्जाची आध्यात्मिकता असते. त्याचबरोबर दुसऱ्यांना बरे करण्याची क्षमताही (Healing Power) त्यांच्याकडे असते.
7 हा अंक ज्ञान, विज्ञान, संशोधन, शिक्षण, अमूर्त संकल्पनानिरीक्षण, विश्लेषण यांच्याशी संबधीत आहे. हा जन्मांक असणाऱ्या व्यक्ति जास्त करून वरील क्षेत्रात आघाडीवर दिसतात.
सहसा हे लोक समाजापासून अलिप्त रहातात आणि कामाशिवाय फारसा कुणाशी संबंध ठेवत नाहीत. सामाजिक कामांमध्ये हे लोक सहसा दिसत नाहीत.
गु ण: परिस्थितीनुसार स्वतमध्ये बदल करत राहणं हा मूलांक ७ असलेल्या लोकांचा मुख्य गुण आहे. त्यांची कलात्मक दृष्टी त्यांना स्वतंत्र तेज देते. प्रतिकूल परिस्थितीचा ते सहज स्वीकार करतात. वैचारिक चंचलता ह्या त्यांच्या गुणामुळे त्यांना ओळखले जाते.
दुर्गुण: अधीर स्वभाव, शौर्याचा अभाव आणि नेहमी इतरांवर अवलंबून राहणे हे यांचे मुख्य दुर्गुण आहेत. योग्य वेळेवर निर्णय न घेणे किंवा शेवटपर्यंत निर्णय न घेणे हे त्यांच्या अयशस्वीपणाचे प्रमुख कारण आहे.
भाग्यशाली तिथी: प्रत्येक महिन्याची २, ४, ७, ११, १३, १६, २०, २२, २५, २९ आणि ३१ तारीख तुमच्यासाठी शुभ आहे.
भाग्य दिवस: प्रत्येक आठवडय़ातील सोमवार व रविवार तुमच्यासाठी भाग्यवान आहे. जर याच दिवशी तुमची भाग्यशाली तिथी असेल तर हा योगायोग तुमच्यासाठी शुभ ठरेल.
शुभ रंग: क्रीम, सफेद, पिवळा, गुलाबी तुमच्यासाठी भाग्यशाली आहेत. याशिवाय, विशेष कार्यासाठी फिक्कट लाल व फिक्कट पिवळा रंगही तुमच्यासाठी शुभ आहे.
भाग्य मंत्र: ॐ सौं सोमाय नम
ॐ नम शिवाय शुभम शुभम कुरु कुरु शिवाय नम ॐ
ॐ गं गणपतये गं नम