8 हा अंक कांही लोकांनी अतिशय बदनाम केला आहे. ज्योतिषांनी या अंकाचा संबंध शनि या ग्रहांशी जोडला आहे आणि शनीचे सगळे दुर्गुण या अंकाच्या माथी थोपले आहेत. चालडियन अंकशास्त्राची प्रॅक्टिस करणाऱ्या न्यूमरॉलॉजिस्टांनीदेखील (जे जास्त करून ज्योतिषी असतात) या अंकाचा संबंध शनिशी जोडून हा अंक बदनाम केला आहे.
पण प्रत्यक्षात कोणत्याही अंकाचा कोणत्याही ग्रहाशी संबंध नसतो, आणि कोणत्याही अंकावर कोणत्याही ग्रहाचा प्रभाव नसतो.
गुण तुमचा जन्मांक 8 असेल आणि कोणी तुम्हाला सांगत असेल की 8 हा अंक वाईट आहे, तर अजिबात घाबरू नका. नेहमी लक्षात ठेवा की कोणताही अंक चांगला किंवा वाईट नसतो, आणि प्रत्येक अंकात कांही गुण तर कांही दोष असतात.
तुम्ही तुमच्या क्षमता ओळखा, त्यानुसार स्वतःचा विकास करा. एक दिवस असा येईल की 8 अंकाला वाईट ठरवणारे लोक मागे पडतील आणि तुम्ही पुढे जाल!
या व्यक्ति सावधचित्त असतात, समोरच्या व्यक्तीला जज करण्यात पटाईत असतात आणि समोरील व्यक्ति वाईट भावनेची असेल तर यांना ते लगेच कळते. हे गुण जन्मांक 8 असणा-या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात.
हा जन्मांक असणा-या लोकांना येणाऱ्या समस्या या बहुतेक वेळा त्यांनी स्वत: ओढावून घेतलेल्या असतात. सतत तणावाखाली रहाणे, छोटाश्या कारणाने नाराज होणे, झटपट निर्णय न घेणे, कामे पुढे ढकलणे, एकलकोंडेपणा, अतिरिक्त ठामपणा, इतरांशी फारसा संवाद न साधणे, आपल्या भावना व्यक्त न करता येणे हे 8 हा जन्मांक असणाऱ्यांचे कांही ठळक दोष.
यांचे लहानपण बहुधा खडतर गेलेले असते आणि यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट उशीरा घडत असते.
त्यांना घरून फारसे कांही मिळत नाही आणि ते जे कांही करतात ते स्वत:च्या हिम्मतीवर करतात. आयुष्याच्या उत्तरार्धात या व्यक्ति खूप यशस्वी झाल्याचे दिसते.
जन्मांक 4, 6 किंवा 2 असणा-यांशी यांची चांगली नाळ जुळते.
हा अंक परस्परविरोधी गुणदोष असणारा आहे. म्हणजे हा जन्मांक असणाऱ्या व्यक्तीमध्ये अतिशय यशस्वी होण्याची अथवा अतिशय अयशस्वी होण्याची क्षमता असते. त्याचप्रमाणे ते प्रत्यक्ष जीवनात ते एकतर हिरो नाहीतर व्हिलन होतात.
8, 17, 26 या तारखेस जन्मलेल्या लोकांचे गुणदोष साधारणपणे वरीलप्रमाणे असतात, आणि 8 पेक्षा 17 मध्ये आणि 17 पेक्षा 26 मध्ये हे गुणदोष जास्त प्रमाणात आलेले दिसतात.
अंकशास्त्रानुसार, जे लोक ८ क्रमांकाशी संबंधित आहेत, ते अभियंता, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, तेल, पेट्रोल पंप, रिअल इस्टेट, बांधकाम आणि लोखंडाच्या व्यवसायात चांगले पैसे कमावतात. सर्वा सोबत . मूलांक ८ च्या राशीच्या लोकांसाठी हलका निळा आणि काळा रंग शुभ मानला जातो. दुसरीकडे, शनिवार आणि शुक्रवार या लोकांसाठी शुभ दिवस आहेत.
जन्मांक 8 असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति: मदर तेरेसा, बाबा आमटे, प्रकाश आमटे, मन मोहन सिंग, नरेंद्र मोदी, स्टीफन हॉकिंग, मनेका गांधी, एम. जी. रामचंद्रन, हैदर अली.