Thursday, 23 March 2023

मूलांक ९

कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो.जन्मांक 9 असणा-या व्यक्तीमध्ये जन्मांक 1 चे अनेक गुण दिसून येतात. जन्मांक 1 सारखेच प्रचंड आत्मविश्वास, आक्रमकता, साहसीपणा, लढाऊपणा हे गुण जन्मांक 9 मध्ये दिसून येतात. पण जन्मांक 9 असणाऱ्या व्यक्तिंना जन्मांक 1 असणा-या व्यक्तिंसारखे झटपट यश मिळत नाही तर उशीरा मिळत असते. याचे कारण म्हणजे हा अंक उशीर लावणारा अंक आहे. पण हळूहळू का होईना, या व्यक्ती जीवनात मोठी प्रगती करू शकतात.

यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो.

गुण जन्मांक असणाऱ्याचं आणखी एक वैशिष्ठय म्हणजे या जन्मांक 9 असणा-या व्यक्ति मानवतावादी, दयाळू आणि क्षमाशील असतात. त्यांच्याकडे समाजाच्या भल्यासाठी लागणारी दूरदृष्टी आणि आदर्श असतात. या व्यक्ति नम्र आणि निस्वार्थी असतात. इतरांच्या भल्यासाठी त्याग करण्याची वृत्ती त्यांच्यात असते. ते उदारहृदयी असतात आणि आपल्याकडे जे कांही आहे ते इतरांना देण्याची त्यांची वृत्ती असते. आपल्या भोवतालच्या लोकांबद्दल त्यांना प्रचंड प्रेम असते आणि त्यांची काळजी वाहण्याची या व्यक्तींची प्रवृत्ती असते.

यांच्याकडे प्रचंड सहनशक्ती असते. तसेच त्यांच्याकडे कल्पनाशक्ती आणि नवनिर्मिती हे गुणही असतात.

यांच्या कोअर नंबर्समध्ये चार्टमध्ये 7, 8, 1

1 यापैकी एखादा अंक आला असेल किंवा 9 या अंकाचे रिपीटिशन झाले असेल तर हे जास्तच आध्यात्मिक असतात. त्याचप्रमाणे यांचा ऑकल्ट सायन्सेस (गूढ विद्या) कडे ओढा असतो.

जन्मांक असणाऱ्या लोकांचे इतरांपेक्षा जास्त प्रमाणात अपघात होत असल्याचे दिसतात. त्यामुळे या लोकांनी वाहने जपून चालवली पाहिजेत, व इतर ठिकाणीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

करियर मोठे प्रोजेक्ट, मोठ्या व अवजड उद्योगात, जमिनीशी संबंधित उद्योगात यांना मोठे यश मिळते. या व्यक्ति कला, साहित्य, संगीत इत्यादी क्षेत्रातही आपला ठसा उमटवू शकतात.

व्यक्तिमत्व- यांचे व्यक्तिमत्व खूपच तेजपूर्ण आणि ऊर्जायुक्त असते. कठोर परिश्रमांना ते घाबरत नाहीत. यांची संकल्पशक्ती खूपच प्रबळ असते. यांच्यात आक्रमकपणा आणि क्रोध सहज दिसतो. संतापावर त्यांना नियंत्रण ठेवता येत नाही. चलाखपणा त्यांना जमत नाही. दूरदृष्टी त्यांच्यात क्वचितच आढळते. मूलांक ९ हा सत्ता, शक्ती, शौर्य आणि साहसाचा अंक आहे. शासन आणि प्रशासकीय प्रवृत्ती त्यांच्यात सहज आढळते. ते सहज संतापतात आणि भाषेवरचं नियंत्रण गमावून बसतात. पण नंतर लगेच आपली चूक सुधारण्याचा प्रयत्नही करतात. इतर लोक यांच्या कठोर इच्छाशक्तीला अहंकार समजतात, परिणामी त्यांना खूप शत्रू निर्माण होतात.  
 भाग्यशाली तिथी- प्रत्येक महिन्याची ३, ६, ९, १२, १५, १८, २१, १४, २७ आणि ३० तारीख तुमच्यासाठी शुभ आहे.
 
भाग्यशाली दिवस- प्रत्येक आठवडय़ातील मंगळवार आणि गुरुवार तुमच्यासाठी भाग्यशाली आहेत. 
 
शुभ रंग- ऑरेंज रंग तुमच्यासाठी अतिशुभ आहे. याशिवाय पिवळा, गुलाबी, क्रीम व सफेद रंग शुभ आहेत. महत्त्वपूर्ण कामांसाठी लाल रंगाचा वापरही शुभ ठरेल. 
 
भाग्यशाली वर्ष- ९, १२, १५, १८, २१, २४, २७, ३०, ३३, ३६, ४२, ४५, ५१, ५४ आणि ६०वे वर्ष तुमच्यासाठी महत्वपूर्ण आणि भाग्यशाली ठरतील.
 
संबंधांसाठी शुभ अंक- मूलांक ३ आणि ४ यांच्याबरोबर तुमचे चांगले सामंजस्य राहील. मूलांक १, ४ आणि ८यांपासून तुम्हाला त्रास होऊ शकतो. 

भाग्यशाली देव- मंगळ, भूमी, सूर्य आणि शक्ती यांच्या उपासनेपासून तुम्हाला विशेष लाभ होऊ शकतो. श्रावणात शिव आणि शक्तीची आराधना केल्यास तुमची खूप उन्नती होईल.
 
भाग्य रत्न- मूंगा आणि माणिक हे आपले भाग्य रत्न आहे. ५-५ कॅरेटच्या वजनाची रत्ने सोन्यात धारण करा. मानसिक शांतीसाठी चांदीमध्ये मोती धारण करणे चांगले राहील. 
 
कल्याणकारी मंत्र- ॐ अंगार काय नम
ॐ हौं जूं स
ॐ ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मै नम 
 
कल्याणकारी उपाय- संकटांपासून वाचण्यासाठी दर सोमवारी शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा. प्रश्नणायाम करावा. दररोज मातीच्या भांडय़ात तूपाचा दीवा लावा. चांदीचा चमचा वापरावा. स्टील आणि लोखंडाच्या चमच्यांचा वापर कमीतकमी करा.
जन्मांक 9 असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति: राम कृष्ण परमहंस, नेल्सन मंडेला, लिओ टॉलस्टॉय, आचार्य आनंद ऋषि, विजया लक्ष्मी पंडीत, गॅलिलिओ, बरट्रांड रसेल, टॉम हॅन्क्स, ब्रॅड पिट.

मूलांक ९

कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो.जन्मांक 9 असणा-या व्यक्तीमध्ये जन्मांक 1 चे अने...