Thursday, 23 March 2023

मूलांक ६

कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म्हणजे या व्यक्तिंच्याकडे दुर्गुण किंवा दोष फार कमी असतात. या व्यक्ति समाजात चांगल्या आणि जबाबदार व्यक्ति म्हणून ओळखल्या जातात.

कुटुंबवत्सलता हा जन्मांक 6 चा सगळ्यात मोठा गुण आहे. हा जन्मांक असणा-या व्यक्ति आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडतात. त्यांचे कुटुंब हाच त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो. त्याचबरोबर ते उपजीविकेसाठी जे कांही काम करतात तेही प्रामाणिकपणे आणि मन लावून करतात.

या व्यक्ति अतिशय मनमिळावू, प्रेमळ, मृदुभाषी, इतरांची काळजी घेणाऱ्या, आणि इतरांना मदत करणा-या असतात. त्याचबरोबर या व्यक्ति भौतिक सुखांचा आणि जीवनाचा उपभोग घेणा-या असतात.

त्यांची दृष्टी कलात्मक असते. त्यामुळे कलेशी संबधीत व्यवसाय, डिझायनिंग, फॅशन इंडस्ट्री, संगीत यात यशस्वी झालेले दिसतात.

6 हा राजकीय लीडरशिपचा अंक नाही. त्यामुळे राजकीय क्षेत्रात या व्यक्ती कमी प्रमाणात दिसतात. या उलट सामजिक प्रश्नांवर नेतृत्व करण्यात 6 जन्मांक असणारे लोक खूप यशस्वी झालेले दिसतात.

शुभ दिवस : बुधवार, शुक्रवार हे दिवस अतिशुभ आहेत.

शुभ तारीख: ३,६, ९, १२, १५, १८, २१, २४ या तारखांना महत्त्वाची कामे करावीत.

भाग्यशाली रंग: सफेद, फिकट निळा, गुलाबी, हिरवा आणि चॉकलेटी रंग अतिशय शुभ मानला जातो.

लकी नंबर्स
6 आणि एक अंकी बेरीज 6 येणारे अंक

सुसंगत नंबर्स (Compatible Numbers)
3, 6, 9, 2, 4
विसंगत नंबर्स (Incompatible Numbers)
1, 5, 7

करीअर:
जन्मांक सहा असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति म्हणजे निरो, बादशहा अकबर, श्री अरविंदो, मायकेल अॅन्जेलो, आण्णा हजारे, शांतीलाल मुथ्था, संजय नहार, पी.जी. वुडहाउस वगैरे.

(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव त्यामुळे या अंकाचे गुणदोष कमी-जास्त होऊ शकतात).

मूलांक ९

कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो.जन्मांक 9 असणा-या व्यक्तीमध्ये जन्मांक 1 चे अने...