!!श्री स्वामी समर्थ !! स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र मानवी जीवनाला आणि मनाला स्वामींचा लाभलेला आत्मविश्वासच आहे. हे स्तोत्र नित्य पठण केल्यास माणसाच्या मनातील अनामिक भीती दूर होऊन, आत्मविश्वास वाढीस लागतो. त्यामुळे रोज नवीन ऊर्जा अंगी येते. अशक्य ते शक्य करण्याचे सामर्थ्य या श्लोकात आहे.
।।गुरू :ब्राह्म गुरू विष्णू:
गुरू देवो महेश्वरा
गुरू साक्षात परब्रह्म
तस्मै श्नी गुरूवे नमः ।।
निःशंक होई निर्भय होई मना रे
प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे
अतर्क्य अवधत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। \
उगाचि भितोसी भय हे पळू दे
वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळु दे
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
खरा होईल जागा श्रद्धेसहीत कसा
होसी त्याविण तू स्वामी भक्त
आठव कितीदा दिली त्यांनाच साथ
नको डगमगू स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ
स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई
आठवी रे प्रचिती न सोडिती तया
जया स्वामी घेती हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
निःशंक होई निर्भय होई मना रे
प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे
अतर्क्य अवधत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। \
स्वामी देवांची सेवा करताना तारक मंत्र म्हणून देवाची उपासना करावी. भिऊ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत.!! श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ!!