Tuesday, 21 March 2023

स्वामींची पूजा घरी कशी करावी जाणून घ्या.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो श्री स्वामी समर्थाचे भक्त खूप जन आहेत. रोज सकाळी स्वामी समर्थाची पूजा अर्चना केली जाते. 
तर मित्रांनो आपण रोज सकाळी आपल्या देवघरात स्वामींचा फोटोची पुजा करतो. तर मित्रांनो, स्वामींची पूजा करताना श्रद्धेने मनोभावे व विश्वासाने ही पूजा करावी.म्हणजेच स्वामी आपल्या कुटुंबावर व प्रत्येक व्यक्तीला स्वामींचे दर्शन होईल व प्रसन्न होतील.
स्वामींची पूजा नित्य नियमाने न चुकता केली पाहिजे. आपल्या घरात कोणत्याही  व्यक्तीने, पुरुष किंवा महिलांनी स्वामींची पूजा केली तरी चालते.

सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून देव घरात प्रवेश करायचा आहे. स्वामींची पूजा करत असताना मनात श्रद्धा  असावी.  विश्वास  व मनोभावे पूजा करावी. म्हणजे त्याचा लाभ आपल्याला नक्कीच मिळेल. पण ही पूजा न चुकता करावी. 
देवाची पूजा करताना सगळ असावे अस काही नसत, आपल्या मनात श्रद्धा असली की देव पावतो. 
अगदी सोपी व सरळ साधी स्वामींची पूजा आहे. मित्रांनो, आपल्या देवघरात स्वामींचा फोटो हे प्रत्येकाच्या घरात असतोच तर पूजा करत असताना आपण खाली बसण्याच्या आधी पाठ किंवा छोटी चटई घेऊनच बसावे व स्वामींच्या फोटो समोर बसावे. खाली बसल्यावर एक छोटेसे आरतीचे ताट तयार करायचे आहे.
तसेच ,आरतीचे ताट तयार करत असताना दोन कापसाचे वाती, पाणी, हळद-कुंकू ,अष्टगंध ,सफेद रंगाची फुले, गोड दूध हे सर्व त्या आरतीच्या ताटात ठेवायचे आहे. तर मित्रांनो, स्वामींची पूजा करत असताना स्वामींच्या फोटोला अष्टगंध लावा .अगरबत्ती ,दिवा ,सफेद रंगाची फुले अर्पण करावी. गोड दूध म्हणून प्रसाद दाखवा. पण दूध ठेवताना त्यात तुळशीचे पान टाकायला विसरू नका.तसेच छोटा पेला  भरून पाणी ठेवावे. हे सगळे झाले की स्वामींच्या फोटोला नमस्कार करा व मनात कोणता विचार आणू नका. कोणत्याही गोष्टींचा विचार करू नका, करण स्वामींची  सेवा करताना आपले मन साफ असावे. म्हणजे त्याचे लाभ आपल्याला मिळतील. स्वामींची  जप माळ ओढायची  आहे. स्वामी पुढे ठेवलेले दूध घरातील सर्वांना प्रसाद म्हणून देयच  आहे. प्रसाद तुम्ही अगदी गूळ किंवा साखर सुद्धा देवाला ठेऊ शकता. 
सगळ्यात महत्त्वाचे "अन्न दान हेच श्रेष्ठ दान " म्हणून तुम्ही कधीही कोठेही कसली ही मदत इतरांना करा. 
"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"
श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! 

मूलांक ९

कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो.जन्मांक 9 असणा-या व्यक्तीमध्ये जन्मांक 1 चे अने...