Saturday, 18 March 2023

पुजा करताना शंखनाद करण्याच का महत्त्वाचे आहे.

नमस्कार मित्र  मैत्रिणींनो, 
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेलेले आहे. आपल्या देवघरांमध्ये विधीवत पूजा अर्चना ही दररोज केली जाते. अनेक मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण प्रार्थना देखील देवांपाशी करीत असतो. तसेच आपल्या घरातील वादविवाद दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी देखील आपण देवांना विनवणी करीत असतो.

हिंदू धर्मात शंखाला पवित्र मानलं गेले आहे. कोणत्याही  धार्मिक कार्यक्रमात शंखनाद करून सुरवात केली जाते. शंख घरात असावा की असू नये, याबाबतही अनेक तर्क लावले जातात. वास्तविक पाहता सामान्य जीवनात शंख महत्त्वाचा आहे. शंख नादाने वातावरण पवित्र होते. तसेच केवळ शंख स्थापन केल्यामुळे अनेक रोग दूर होतात, अशी मान्यता आहे. वास्तुशास्त्र आणि फेंगशुई यानुसार शंखनाद आणि शंखाचे अनेक फायदे. 

शंखनाद करणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर मानले जाते. 
शंखनाद केल्यामुळे शरीरातील तसेच हृदयरोगासंबधी  आजार होत नाहीत. हृदयरोगाची संबंधित काही त्रास असल्यास शंखनाद करण्याचा सल्ला दिला जातो. शंखनाद करण्यासाठी मोठ्या श्वासाची गरज लागते, श्वसनाचे प्रमाण वाढल्याने आणि श्वासोच्छवासाची प्रक्रिया प्रदिर्घ झाल्यामुळे ह्रदयाला याचा चांगला फायदा होतो. फेंगशुई शास्त्रानुसार, शंख ठेवणे अतिशय शुभ मानले गेले आहे. आपल्या कार्यक्षेत्रात सुख-समृद्धी आणण्यासाठी शंख ठेवणे, फायद्याचे असते, असे शास्त्र सांगते. एवढेच नव्हे तर भगवान गौतम बुद्धांच्या पायावर असलेल्या ८ शुभ चिन्हांपैकी एक शंख असल्याचे सांगण्यात येते
शंखनादामुळे घरातील वातावरण शुद्ध होते; पवित्र होते. तसेच शंखनादाचा शरीरालाही तितकाच फायदा होतो, असे सांगितले जाते. शंखनादामुळे श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरळीत होण्यात मदत होते. तसेच मानसिक समस्याही दूर केल्या जाऊ शकतात. त्यामुळे केवळ वास्तू किंवा फेंगशुई नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही शंखाचे फायदे आणि महत्त्व विशेष आहे.
एखाद्या घरात सतत वादविवाद होत असल्यास शंख घरात ठेवणे फायद्याचे आहे, असे मानले जाते. काही घरांमध्ये वारंवार वाद होत असतात. अनेक प्रयत्न करूनही वाद शमत नाहीत. अशावेळी आपल्या घरातील लिव्हिंग रुममध्ये दक्षिण-पश्चिम दिशेला शंख ठेवावा, असे वास्तुशास्त्र सांगते.
वास्तुशास्त्रही शंखाचे महत्त्व अधोरेखित करते. एखाद्या व्यक्तीला प्रसिद्धी हवी असल्यास दक्षिण दिशेकडे शंख ठेवावा. घरात कोणत्याही ठिकाणी शंख ठेवणे चुकीचे आहे. लिव्हिंग रुममधील दक्षिण दिशेला शंख ठेवावा. तसेच शिक्षण क्षेत्रात अपयश येत असल्यास अभ्यासिकेच्या उत्तर-पूर्व दिशेला शंख ठेवावा. असे केल्यास परीक्षेत आणि स्पर्धांमध्ये यश मिळू शकते, असे शास्त्र सांगते.

मूलांक ९

कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो.जन्मांक 9 असणा-या व्यक्तीमध्ये जन्मांक 1 चे अने...