त्यांच्याकडं उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य असतं. लोकांच्याकडून कामं करवून घेणं यांना चांगलंच जमतं. पण यांच्याकडून आपल्या हाताखालील लोकांवर बॉसिंग होण्याचीही शक्यता असते.
या व्यक्तींना प्रचंड आत्मविश्वास असतो आणि तो त्यांच्या बोलण्यातून आणि बॉडी लँग्वेजमधून ठळकपणे जाणवत असतो. त्यांना पाहिजे असलेली गोष्ट या व्यक्ति मिळवतातच.
या जन्मांकामध्ये 19 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीं राजकीय नेतृत्वात जास्त यशस्वी होण्याची शक्यता असते, महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. मोठमोठे नेते, लढाऊ राजे, सेनापती, उद्योजक, वेगवेगळ्या क्षेत्रात नवीन कांहीतरी करणारे यांच्यात 1 जन्मांक असणा-या लोकांची संख्या जास्त प्रमाणावर दिसते. या अंकाला ‘विजेता अंक’ (Winner Number) म्हणता येईल.
जन्मांक 1 असणा-या व्यक्तिशी कुणी शत्रूत्व पत्करले, तर त्या शत्रूचा पाडाव होणार हे नक्की असते. पण विशेष म्हणजे शत्रूनं चांगली लढत दिल्यास त्याचं कौतुक करण्याचा दिलदारपणा देखील त्यांच्यात असतो. कुणी दगाबाजी केल्यास या व्यक्ति त्याचा निर्दयपणे बंदोबस्त करतात.
या व्यक्ति आपल्या आयुष्यात परफेक्ट हिरो अथवा परफेक्ट व्हिलन बनण्याची शक्यता असते.
त्यांचं रहाणीमान उच्च दर्जाचे असतं. या व्यक्ति भौतिक यशाला सर्वाधिक महत्व देतात. त्यांना पैसा, संपत्ती आणि आरामदायक जीवन यांची आवड असते. त्यांना चांगल्यातल्या चांगल्या वस्तूंची आवड असते. जसे, ते महागडे घर, महागडी कार खरेदी करतील,फिरायला दुसरीकडे जातील तेंव्हा तेथे महागड्या हॉटेलमध्ये रहातील, महागडे जेवण घेतील, आपल्या मुलांना शहरातील सगळ्यात चांगल्या शाळेत दाखल करतील.
या व्यक्ति आपापल्या क्षेत्रात नव्या युगाची सुरवात करणाऱ्या असतात. त्या दिलदार, अनेकांच्या पोशिंद्या, सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या या असतात. कुणावर अन्याय झालेला त्यांना खपत नाही. अगदी त्यांच्या शत्रूवरही अन्याय होत असेल तरी त्यांना ते रुचत नाही.
जन्मांक 1 असणा-या व्यक्तिशी कुणी शत्रूत्व पत्करले, तर त्या शत्रूचा पाडाव होणार हे नक्की असते. पण विशेष म्हणजे शत्रूनं चांगली लढत दिल्यास त्याचं कौतुक करण्याचा दिलदारपणा देखील त्यांच्यात असतो. कुणी दगाबाजी केल्यास या व्यक्ति त्याचा निर्दयपणे बंदोबस्त करतात.
त्यांचे स्पर्धक किंवा शत्रू त्यांच्या विरोधात गुप्त कारवाया करण्याची शक्यता असते, पण जन्मांक 1 च्या व्यक्ती सहसा आपल्या शत्रूंना पुरून उरतात.या जन्मांकामध्ये 19 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीं राजकीय नेतृत्वात जास्त यशस्वी होण्याची शक्यता असते,
जाणून घ्या, काही प्रसिद्ध एक मुळांक असलेल्या लोकांविषयी. पहिले नाव आहे सर्वात श्रीमंत लोकांच्या लिस्टमध्ये एक नंबरवर असलेले मुकेश अंबानी. यांचा जन्म 19 मार्चला झाला आहे. या व्यतिरिक्त धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा दोघांचीही जन्मतिथी 28 डिसेंबर, माजी आणि भारताच्या एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, विश्वसुंदरी सुश्मिता सेन, बॉलिवूडची पहिली सेक्स सिम्बल ऐक्ट्रेस झीनत अमान आणि भारताचे फेमस रेसलर दारासिंह यांचा जन्म 19 नोव्हेंबरला झाला होता. सुरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांची जन्मतारीख 28 सप्टेंबर असून चिरयूवा सुंदर अभिनेत्री रेखा यांची जन्मतारीख 10 ऑक्टोबर आहे. क्रिकेटर सुनील गावस्कर यांची जन्म तारीख 10 जुलै तर बिल गेट्सयांची बर्थडेट 28 ऑक्टोबर आहे. याच यादीमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनचाही समावेश आहे. लादेनचा जन्म 10 मार्चला झाला होता.
लकि नंबर - १ व एक अंकी बेरीज १ येणारे नंबर( उदा. १२३४ १+२+३+४=१० १+०=१) , म्हणून १२३४ हा लकी नंबर आहे.
फ्रेंडली नंबर -१,५ ,७
अनफ्रेंडली नंबर - २,४,६
लकी कलर- सोनेरी, पिवळा, ब्राऊन