*शनिवारी शनि दोष कमी करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावे. तसेच पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालावी *
*कधीही संध्याकाळच्या वेळी तुळशीचे पान तोडू नये. खासकरुन संक्रांत, द्वादशी, अमावस्या, पौर्णिमा आणि रविवारी तुळशीच्या रोपाला स्पर्श देखील करु नये. *
महिलां भोपळा, नारळ आणि कलिंगड तोडू नये किंवा ते चाकूने देखील कापू देखील नये. चुकूनही देवाच्या नैवाद्याला ओलांडून जाऊ नये.
*एकादशीच्या दिवशी, अमावस्या, पौर्णिमा आणि श्राद्ध या दिवशी दाढी कापू नये. पूजा करण्यापूर्वी तुम्ही जेनेऊ घातलेच पाहिजे. जेनेऊ परिधान न करता उपासना केल्यास कोणतेही फळ मिळत नाही.*
* भगवान शंकराला कुंडाचे फुल, विष्णूला धतुरा, देवीला शेवरी आणि सूर्यदेवाला तगरीचे फुल कधीही अर्पण करू नये.*पू
*पूजेच्या वेळी आपल्या डाव्या बाजूला तूपांचा दिवा लावा आणि देव-देवतांना उजव्या बाजूला ठेवा. तसेच, तांदळाच्या राशीवर दिवा लावावा.*
* असे मानले जाते की, कमळांचे फूल 5 रात्र ताजे राहते. त्याचप्रमाणे तुळशीची पाने देखील 10 रात्रींपर्यंत शिळी होत नाहीत.*
* पूजा करताना आपला चेहरा पूर्वेकडे ठेवावा. पाणी, शंख आणि पूजा सामग्री आपल्या उजव्या बाजूला ठेवा. त्याच वेळी, घंटी आणि धूप डाव्या बाजूला ठेवावा.*
(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)